'टग्यांना' पोलिस 'सिंघम' गिरी दाखवणार का...?

शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा सवाल...

शिरुर तालुक्यातील एखादा बेरोजगार युवक जर कंपनीत नोकरी मागायला गेला तर मात्र त्याला स्थानिक असल्याचे कारण देऊन कामावर घेतले जात नाही. मग कंपनी प्रशासनाला जर स्थानिक ठेकेदार चालतात तर स्थानिक कामगार का...? चालत नाहीत.

रांजणगाव गणपती: रांजणगाव औद्योगिक वसाहत हि आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित वसाहत आहे. तिथं अंदाजे ४०० लहान मोठ्या कंपन्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपन्यामध्ये कामाचे ठेके मिळवण्यासाठी दोन गटात भांडणे होत असतात. त्यामुळे तिथं स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात दादागिरी कमी झाली. परंतु आता पुन्हा एकदा या गोष्टीला सुरवात झाली असुन बाभुळसर खुर्द येथील देवकर आणि वाळके कुटुंबियांनी एकमेकांना केलेली मारहाण याला जुन्या २ ते ३ महिन्यापुर्वी स्क्रॅबच्या ठेक्यावरुन झालेल्या वादाची किनार आहे. या वादामुळे दोन कुटुंब एकमेकांच्या जीवावर उठली असुन दोन्ही कुटुंबातील महिला, वृद्ध माणसं, आणि लहान मुलं यांनाही या वादाची झळ पोहचली आहे. याच पार्श्वभुमीवर दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी शनिवारी दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली.

दारुधंद्याकडे पोलीसांचे होतेय दुर्लक्ष...?

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत शिरुर तालुक्यातील अनेक मात्तबर पुढाऱ्यांचे ठेके आहेत. तसेच शिरुर तालुक्याच्या बाहेरच्या पुढाऱ्यांचे सुद्धा काही कंपनीत ठेके असल्याची चर्चा आहे. परंतु शिरुर तालुक्यातील एखादा बेरोजगार युवक जर कंपनीत नोकरी मागायला गेला तर मात्र त्याला स्थानिक असल्याचे कारण देऊन कामावर घेतले जात नाही. मग कंपनी प्रशासनाला जर स्थानिक ठेकेदार चालतात तर स्थानिक कामगार का...? चालत नाहीत. तसेच एखाद्या कंपनीत जर कोणी एखाद्या कामाचा ठेका मागायला गेला तर कंपनी प्रशासन लगेच नकार देते किंवा प्रस्थापित नेत्यांना याची माहीती दिली जाते. अन्यथा सदर व्यक्तीवर खोटे-नाटे गुन्हे दाखल करुन त्याला अडचणीत आणले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी कुठं जायचं हा मोठा प्रश्न आहे.

जुन्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हे दाखल

शिरुर तालुक्यात प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांच्या मागे-पुढे करणारे बगलबच्चे असुन याच बगलबच्यांना पुढे करुन एखाद्या ग्रुपची स्थापना केली जाते. शिरुर तालुक्यात असे अनेक ग्रुप सक्रिय असून रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाच्या ठेक्यावरुन त्यांच्यात कायम धुसफुस चालूच असते. कंपनी प्रशासन अनेकवेळा कामगारांची पिळवणूक करतात. त्यावेळी कामगारांनी युनियन केली तर हेच राजकीय पुढारी मध्यस्थी करुन स्वतःचा स्वार्थ साधत कामगारांवर अन्याय करतात. कामगारांची गळचेपी करणारे हे स्थानिक पुढारी आणि त्यांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कान्हूरच्या ११ विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षेत बाजी

"भाई" गिरीत तरुणपिढी सक्रीय...?
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्याने मग हेच स्थानिक तरुण कोणत्यातरी राजकीय पुढाऱ्यांच्या ग्रुपमध्ये सामील होतात आणि मग त्या ग्रुपसाठी काम करतात. ग्रुपच्या नेत्याचा पाठिंबा मिळाल्यावर स्वतःला "भाई" समजायला लागतात. असे अनेक छोटे-मोठे भाई  सध्या शिरुर तालुक्यात उदयास येत असुन त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. कमी वयात कंपनीच्या ठेक्यातुन मिळालेल्या पैश्यामुळे गावागावात टोळ्या तयार करुन भांडण करण्याचे नसते उद्योग करण्यात त्यांची शक्ती खर्च होते. त्यातूनच अगदी एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत यांची मजल जाते. त्यामुळे प्रत्येक गावात अश्या "टगेगिरी" करणाऱ्या युवकांना पोलिसांचा धाक असण गरजेचा आहे. त्यामुळे पोलिसांनी आता "सिंघम" गिरी दाखवणं गरजेचं आहे.   

 

Title: Will the police show Singham Giri to Tugs
प्रतिक्रिया (1)
 
Ramrao walke
Posted on 26 July, 2021

akdam khare aahe yachya palikade ajun kahi aahe pl.contact me.