अभिमन्यू-लतिकाच्या नात्यात येणार का कायमचा दुरावा...?

काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबासमोर आले. हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नाते पणाला लागले. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि - लतिकाबद्दल झाले आहे.

मुंबई: कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेचे कथानक नवीन वळणावर आले आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबासमोर आले. हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नाते पणाला लागले. प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि - लतिकाबद्दल झाले आहे.

पुस्तक बदआयुष्य लू शकते; अशोक पवार

दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागत आहे. एकीकडे अभिमन्यूने आईला दिलेले वचन की, मी लतिकाला घरी परत घेऊन येणार. तर दुसरीकडे, लतिकाने बापूंना दिलेला शब्द. लतिका बापूंच्या विरुद्ध जाऊन अभिमन्यूला साथ देईल? हे सगळंच प्रेक्षकांना हळूहळू मालिकेमधून कळणार आहे. अभिमन्यू - लतिका या संकटाला कसे सामोरे जातील? कशी एकमेकांची साथ देतील?

त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने किरण पिंगळे यांचा सत्कार...

वटपौर्णिमेच्या दिवशी अभिमन्यू आणि लतिकाचे जुळू पाहणारं नातं पुन्हा दुरावलं. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारातून तिला बाहेर काढलं. अभिमन्यूसमोर आता मोठा पेच उभा ठाकला आहे त्याला लतिकासोबतच बापू आणि संपूर्ण कुटुंबाची मनं जिंकायची आहे.त्यामुळे मालिकेत पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी सुंदरा मनामध्ये भरली मालिका नक्की पहा.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Will there be a permanent distance between Abhimanyu and Lat