विधानसभा मतदार संघात पुन्हा होणार निवडणूक? काय असेल कारण...

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसने एकूण १८९ जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा थोडा आश्चर्यकारक आहे.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसने एकूण १८९ जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा थोडा आश्चर्यकारक आहे.

सोशल डिस्टंसिंग: नवरा-नवरीने काठ्यांच्या मदतीने घातले गळ्यात हार

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

खारदा विधानसभा मतदारसंघातील तृणमूलचे उमेदवार काजल सिन्हा १८,५७३ इतक्या मतांचा आघाडी घेऊन विजयी झाले आहे. मात्र हा निकाल लागण्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता पुन्हा निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजल सिन्हा यांचे काही दिवसांपूर्वीच करोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. २२ एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यासाठी खारदा विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झाले त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

दरम्यान, पश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढलेल्या काजल यांचा २५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. काजल यांना करोनाचा संसर्ग झाला होता आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर काजल यांच्या पत्नी नंदिता यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुदीप जैन यांच्या बरोबरच निवडणुक आयोगातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. नंदिता यांनी निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप करताना कोरोना कालावधीमध्ये उमेदवार आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात आयोगाने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप नंदिता यांनी केला होता.

कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा: अजित पवार

पश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदार संघातून काजल सिन्हा यांनी मोठी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे. मात्र, निकालाआधीच कोरोनामुळे त्यांच निधन झालं आहे. कमल सिन्हा या जगात नसल्यामुळे खारदा विधानसभा मतदारसंघासाठी आता पुन्हा निवडणूक आहे.

Title: Will there be re election in the assembly constituency What
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे