महिलेचा विश्वविक्रम, एकाच वेळी 10 मुलांना जन्म...

गोसियामी धमारा सिटहोल (वय 37) नावाच्या महिलेने 7 जून रोजी एकाचवेळी दहा मुलांना जन्म देऊन नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे.

नवी दिल्लीः महिलेने एकाच वेळी 3 ते 4 मुलांना जन्म देणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण, एखाद्या महिलेने एकाच वेळी दहा मुलांना जन्म दिल्याचे कधी ऐकले नसेल. पण, दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने 10 मुलांना जन्म देऊन विश्वविक्रम केला आहे. यापू्र्वी एका महिलेने नऊ मुलांना जन्म दिला होता.

अबब! युवतीने एकाच वेळी दिला नऊ बाळांना जन्म

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'गोसियामी धमारा सिटहोल (वय 37) नावाच्या महिलेने 7 जून रोजी एकाचवेळी दहा मुलांना जन्म देऊन नवीन विश्वविक्रम निर्माण केला आहे. या महिलेचे बाळंतपण सिजेरियनद्वारे करण्यात आले आहे. यात तिने सात मुले आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी प्रसूतीपूर्वी त्या महिलेला 6 मुलांचा जन्म होईल अशी माहिती दिली होती. महिलेच्या पतीने आठ मुलांच्या जन्माची अपेक्षा केली होती. हे जोडपे त्यांच्या 10 मुलांच्या जन्मामुळे खूप आनंदित आहेत. पण, सिटहोलसाठी एकाचवेळी 10 मुलांना जन्म देणे सोप नव्हते. प्रसूतीच्या वेळी डॉक्टरांनी अतिशय सावधगिरीने काम केले आणि त्या महिलेचा आणि तिच्या मुलांचा जीव वाचविला.'

सिटहोल आणि तिची मुले सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की, गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. गरोदरपणात त्यांना वेदना होत होत्या पण आता ठीक आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र, आता एका महिन्यानंतर हा विक्रम मोडला गेला आहे, कारण सिटहोलने एकाचवेळी 10 मुलांना जन्म दिला.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: women world record gave 10 baby birth at south africa
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे