जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी उसळली गर्दी...

राणी असे या गाईचे नाव असून, तिची उंची 66 सेमी तर वजन फक्त 26 किलो आहे. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये जगातील सर्वात ठेंगणी गाय म्हणून केरळच्या गायीचा रेकॉर्ड आहे.

ढाका (बांगलादेश): जगातील सर्वांत ठेंगण्या गायीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. राजधानी ढाकापासून 30 किमी अंतरावर असलेल्या चरीग्राम भागातील एका शेतात ही गाय आहे.

Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

राणी असे या गाईचे नाव असून, तिची उंची 66 सेमी तर वजन फक्त 26 किलो आहे. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये जगातील सर्वात ठेंगणी गाय म्हणून केरळच्या गायीचा रेकॉर्ड आहे. मात्र त्या गायीपेक्षा राणीची उंची 10 सेमी कमी असल्याचा दावा तिच्या मालकाने केला आहे. दरम्यान, 23 महिन्यांची ही राणी सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. जगातील सर्वांत ठेंगण्या गाईचे दर्शन घेण्यासाठी कोरोनाची पर्वा न करता नागरिक चरीग्राममध्ये पोहोचत असून, गाईसह त्यांचा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

'शिकोर अ‍ॅग्रो फार्म'चे व्यवस्थापक एम.ए. हसन हवालदार यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या काळातही नागरिक लांबून प्रवास करून गाय पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. यापैकी बर्‍याच जणांना या राणीबरोबर सेल्फी घेण्याची इच्छा आहे. गेल्या तीन दिवसांतच पंधरा हजाराहून अधिक लोक राणीला भेटायला आले आहेत.' गाईला पाहायला आलेल्या रीना बेगम म्हणतात, 'आयुष्यात एवढी ठेंगणी गाय कधीच पाहिलेली नव्हती.'

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: world smallest cow in bangladesh photo viral corona time peo