यापुढील काळात अन्याय सहन केला जाणार नाही; प्रविण दरेकर

निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टी चे काम केले म्हणून, स्थानिक लोकप्रतिनिधी दौलत शितोळे यांना त्रास देण्याचे काम करत असेल ते कदापि सहन केले जाणार नसून शितोळे यांच्या पाठीमागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी धमक्या कोणाला देता...? असा सवाल करत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या कुळात जन्माला आलेल्यांना देता का...?

शिरुर: निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टी चे काम केले म्हणून, स्थानिक लोकप्रतिनिधी दौलत शितोळे यांना त्रास देण्याचे काम करत असेल ते कदापि सहन केले जाणार नसून शितोळे यांच्या पाठीमागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी धमक्या कोणाला देता...? असा सवाल करत  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या कुळात जन्माला आलेल्यांना देता का...? यापुढील काळात हे अन्याय सहन केले जाणार नाहीत अन्याय अत्याचाराला प्रत्युत्तर देऊ असा घणाघात विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. सोमवार (दि १३ ) रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यात या महाविकास आघाडी विरोधात रामोशी बेरड समाजाच्या वतीने एल्गार पुकारला असून महाविकास आघाडीची सत्ता उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

प्रविण दरेकर महिलांची माफी मागा अन्यथा...

शिरुर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, मित्रपरिवार आणि शिरुर तालुका जय मल्हार क्रांती संघटनेचे वतीने आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० वी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रविण दरेकर बोलत होते . या कार्यक्रमात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक २३० वी जयंती निमित्त राष्ट्र गीताने मानवदंना देण्यात आली . रामोशी ,बेरडसमाजाचे प्रातिक घोंगडी आणि कुऱ्हाड देऊन विधान परीषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा भव्य पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.

शिरुर तालुक्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचा मोर्चा

यावेळी दौलत शितोळे यांनी सांगितले की,रामोशी बेडर समाजाचा प्रत्येक पक्षाने आजपर्यंत वापर केला. शिरुर-हवेली चे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मदत केली असुन राज्यात भाजप सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या मागणी बाबत आश्वासन दिले .व मागण्यांची पुर्तता केली. त्यामुळे महाराष्ट्रात ७० लाख समाज असुन भाजपाचे पाठीशी राहणार आहे . स्थानिक आमदारांनी तालुक्यात विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचे काम केले असुन याबाबत शिरुर तालुक्यात लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली . तसेच रामोशी बेडर समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने रद्द केल्या मुळे हे यापुढील काळात हे आरक्षण आंदोलन करुन परत मिळविण्यासाठी समाजाने तयार रहावे असे आवाहन करुन राज्यात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करीत असताना शिरुरमधील हे पहिले वर्ष असुन यापुढील काळात दरवर्षी शिरुर शहरात जयंती साजरी करणार असल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांनी केले.

'शिरुर तालुका डॉट कॉम' चा दणका...

या कार्यक्रमास माळशिरसचे आमदार राम सातपुते, सातारा कोरेगाव चे आमदार महेश शिंदे,माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हासंपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे उद्योग आघाडीचे संजय पाचंगे, भाजपा शिरुर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय जाधव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब मदने, कार्याध्यक्ष दिपक चव्हाण, संपर्कप्रमुख संतोष चव्हाण, शिरुर तालुकाध्यक्ष मच्छिंद्र बोडरे, युवकचे तालुकाध्यक्ष संतोष मदने, शिरुर शहराध्यक्ष दिनेश चव्हाण, रुस्तूम सय्यद, सतिश घोलप व क मोठ्या प्रमाणात रामोशी बेरड समाजाचे राज्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते .या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, योगेश टिळेकर, आमदार राम सातपुते, महेश शिंदे यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले . यावेळी उपस्थितां चे आभार भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी मानले, प्रास्ताविक अंकुश यादव तर सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले.


 

Title: Yapudil is not known to tolerate injustice lately Pravin Da