यशच्या खऱ्या आयुष्यातील गौरीला पाहिलंत का...?

'आई कुठे काय करते' या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखचे लग्न झाले असून त्याची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मुंबई: 'आई कुठे काय करते' मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील अनिरुद्ध, अरुंधती, यश, आप्पा, आजी, अभि, ईशा या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख साकारतो आहे. यापूर्वी अभिषेकने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की अभिषेक देशमुखचे लग्न झाले असून त्याची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार...?

अभिषेक देशमुखच्या पत्नीचे नाव आहे कृतिका देव. अभिषेक आणि कृतिका यांनी ६ जानेवारी २०१८ मध्ये लग्न केले. कृतिकाने राजवाडे अँड सन्स या चित्रपटात काम केले होते. तसेच हॅपी जर्नी, 'हवाईजादा' या चित्रपटांमध्ये तिने काम केले. तसेच प्रथमेश परब सोबत तिने प्रेम दे या सीरिजमध्ये देखील काम केले होते.

चक्क आता कोर्टात रंगणार राज विरुद्ध शिल्पाचा सामना...?

अभिनेता अभिषेक देशमुखने या मालिकेआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय तो होम स्वीट होम या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट मध्येही त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Yashchya Khanya Ayushyatil of Gaurila Pahilant