Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

मद्यधुंद अवस्थेत मंगेश नागाला पाहताच मी नागाला पकडतो असे सांगत तो नागाजवळ गेला आणि थेट नागालाच भिडला.

नाशिक: दारूचे सेवन केलेला युवक थेट नागालाच भिडला. दारूची नशा चढल्यामुळे युवक कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नागाने चावा घेतल्यानंतर तो बेशुद्ध पडला. लासलगाव जवळ असलेल्या नांदूरमध्येश्वर येथे हा प्रकार घडला.

May be an image of 1 person and text that says 'इंडियनऑयल साई गणेश पेट्रोलियम रांजणगाव गणपती येथे IndianOil CNG CNG आता ONLINE २४ तास सेवा'

नांदूरमध्येश्वर येथील जिल्हा परिषदेच्या आवारात मोठा विषारी नाग आढळून आला. फणा काढून बसलेल्या नागाला पाहून उपस्थितामध्ये खळबळ उडाली. नागाला कसे पकडायचे असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना तेथून मद्यधुंद अवस्थेत मंगेश भाऊसाहेब गायकवाड हा युवक जात होता. त्याने नागाला पाहताच मी नागाला पकडतो असे सांगत तो नागाजवळ गेला आणि थेट नागालाच भिडला.

नागाने मंगेशला चावा घेतला. नागाने चावा घेतल्याचे पाहून उपस्थितांनी मंगेशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, दारूच्या नशेत असलेला मंगेश कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नागाला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागाने पुन्हा त्याला चावा घेतला. तब्बल चार वेळा नागाने चावा घेतला. शेवटी, मंगेशवर विषाचा परिणाम होऊन बेशुद्ध पडला. त्याला तातडीने निफाडच्या ग्रामीण रुग्णलायत दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगेशची प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातही असाच प्रकार घडला होता. तेथील व्हिडिओही व्हायरल झाला होता.

आईच्या हस्ते kks चे उदघाटन करुन दिला अनोखा संदेश...

https://www.shirurtaluka.com/share_images/home1advt.jpg

May be an image of text

शोले स्टाईल; दुसऱया विवाहासाठी आजोबा चढले खांबावर...

May be an image of 2 people and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

Video: खासदाराने पत्रकार परिषदेतच ओढले महिला खासदाराचे गाल

May be an image of text that says

Title: youth injured while trying to play with snake video viral